Events

⁠⁠⁠

कृषि विज्ञान केंद्रामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले! – मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील

कृषि विज्ञान केंद्र शेतक-यांसाठी तीर्थक्षेत्रे बनवावीत तसेच आपल्या शेती व दुध उत्पादनाच्या वाढीवरच आपला भविष्यकाळ अवलंबून असल्याचे प्रतिपादन मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी निगवे खालसा येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषि विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या संकल्प से सिध्दी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतक-यांनी माती परीक्षण करुन खत व्यवस्थापन करणे गरजेचे असून सेंद्रीय खतांचा शेतीमधील वापर, अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
गाई-म्हशींचे संगोपन निश्चितपणे वाढ होऊ शकते असे ते म्हणाले. कृषि विज्ञान केंद्र करीत असलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी केले. संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी यावेळी विषद केली.
सदर कार्यक्रमामध्ये ‘न्यु इंडिया संकल्प’ प्रतिज्ञा सर्वांना प्रा. डी. एम. पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये जनावरांचे व्यवस्थापन याविषयी निवृत्त्त पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण भट यांनी जनावरांची जात, निवारा, आहार, आरोग्य इत्यादींविषयी सखोल मार्गदर्शन करुन शेतक-यांच्या शंकेचे निरसन केले.
दुस-या तांत्रिक चर्चासत्रात नेटाफिम इरिगेशन प्रा. लि. चे सहायक महाव्यवस्थापक श्री अरूण देशमुख यांनी एकरी १२५ टन उत्पादन तंत्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, लागवड व्यवस्थापन याविषयी सखोल माहिती यावेळी दिली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री बसवराज मास्तोळी यांनी उत्पादन वाढीच्या विविध घटकांचा यावेळी मागोवा घेतला. कृषि खात्यांच्या विविध योजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या.
सदर शेतकरी मेळाव्यास प्रा. धनंजय गायकवाड पंचायत समिती सदस्य सागर पाटील, माजी जि. प. सदस्य, एकनाथ पाटील, किरणसिंह पाटील, सरपंच बच्चाराम किल्लेदार, नागावचे आर. के. रानगे, श्रीपती पाटील, प्ररा. निवास पाटील, एच. के. पाटील, संभाजी बोटे, एस. के. पाटील, कृष्णात पाटील, संदीप गुरव, मार्केट कमीटीचे संचालक विलास साठे, उपस्थित होते
या मेळाव्यास निगवे, चुये, कावणे, खेबवडे, नागाव, इस्पूर्ली, नंदगाव, अर्जूनवाडा, म्हाळुंगे, कौलव, परीते, टिटवे व इतर गावाहून आलेले शेतकरी बांधव, बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान १० मिनीटे किसान फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शेतक-यांसाठी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले तसेच कृषि विषयक तांत्रिक माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर सुर्यगंध यांनी केले तर आभार प्रा. राजवर्धन सावंत भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील व विश्वस्त, ऋतुराज पाटील यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रा. एम. एस. माळी, प्रा. दिपाली मस्के, प्रा. निनाद वाघ, प्रा. सुशांत पाटील, जी. टी. मोरे, पी. एस. पाटील, बी. आर. कांबळे, बी. एस. पाटील, राजू माने व ज्ञानेश्वर डेडे यांचे सहकार्य लाभले.

August 29, 2017

कृषि विज्ञान केंद्रामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले!मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील

⁠⁠⁠ कृषि विज्ञान केंद्रामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले! – मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील कृषि विज्ञान केंद्र शेतक-यांसाठी तीर्थक्षेत्रे बनवावीत तसेच आपल्या शेती…
August 15, 2016

५५ कोटींचे पत्र गुरुवारपर्यंत द्या, विमानतळप्रश्नी पालकमंत्र्यांशी चर्चा करू – सतेज पाटील

May 5, 2016

कोल्हापूरच्या उत्पादनांचे ‘मार्केटिंग’ हवे

April 30, 2016
MLC Of Maharashtra

गरजू घटकांना व उपक्रमासाठी मदत खालील प्रमाणे देण्यात येणार आहे…