माणुसकीची भिंत २०१७ ला दिला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

माणुसकीची भिंत २०१७ ला दिला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माणुसकीची भिंत’ ला या वर्षी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी केले आहे. या माध्यमातून हजारो गरजूंना आपण दिवाळीचा आनंद देऊ केले आहे. देणाऱ्यांचे हात हजार आणि घेणाऱ्यांचा आनंद अमाप. एक चांगले कार्य सर्वांच्या सहकार्याने पार पडले आहे. धन्यवाद कोल्हापूर!

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे” हे ब्रीद मनाशी घेऊन दातृत्ववान कोल्हापूरकरांनी दिवाळी निमित्त वापरता येतील असे कपडे, लहान मुलांचे खेळणे आणि इतर साहित्य दि. १४ -१५ ऑक्टोबर रोजी दसरा चौक येथे हजारोंच्या संखेने दान केली.