गोकुळ : सहकार कि ठेकेदारांचा अड्डा? दूध उत्पादक सभासदांचा सवाल

गोकुळ : सहकार कि ठेकेदारांचा अड्डा? दूध उत्पादक सभासदांचा सवाल

 

 

 

कोल्हापूर : गोकुळचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असल्याने गोकुळच्या वार्षिक सभेसाठी जिल्ह्याच्या कानाकोप­यातून सभासद येणे अपेक्षीत असते. अशा वेळी आजपर्यंत सर्व सभासदांच्या सोयीसाठी गोकुळच्या वार्षिक सभेची वेळ नेहमी दु.1 वाजता असत होती. परंतू यावेळेला सभा गुंडाळण्याच्या उद्देशाने तसेच सभेच्या वेळेत प्रत्यक्ष सभासदर पोहचू नयेत म्हणून जाणीवपूर्वक सभेची वेळ सकाळी 11 अशी करण्यात आली होती. व सभेपूर्वी बोगस पासद्वारे सुमारे दोन ते तीन हजार बोगस सभासद आणून बसविले होते.

राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (गोकुळ) अव्वल आहे, असा डांगोरा पिटणारे चेअरमन श्री. विश्वास नारायण पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये वैद्यनाथ समितीचा उल्लेख करत संघ 70:30 च्या फॉम्र्युल्यानुसार परतावा करत आहे. मुळात वैद्यनाथ समिती ही उत्पादन खर्चावर आधारीत 50 टक्के जादा नफा द्यावा, असे सुचविणारी समिती आहे. परंतू संघाचे चेअरमन सर्वसाधारण लोकांसमोर वारंवार खोटी माहिती देत आहेत. शेजारच्या सांगली जिल्ह्यात संघ 85.02 टक्के परतावा देतो. परंतू गोकुळ मात्र दुध खरेदी, वस्तु व सेवा प्रित्यर्थ 81.42 टक्के इतका परतावा देत आहे. यामुळे गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांचे 73 कोटी 22 लाखांचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर वासाच्या दुधाचे वारंवार प्रश्न विचारु नये त्याबाबत संस्थांना माहिती न देता त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून विहीत मुदतीत 34 प्रश्न गोकुळच्या प्रशासनाकडे उपस्थित केले होते. त्याद्वारे गोकुळमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांचा गैरवापर झालेबाबत सर्व सभासदांचे निदर्शनास आणले होते. त्यामध्ये बल्क कुलर खरेदी, जाहीरात खर्च, गोकुळ शॉपी अपहार, संचालकांच्या गाड्यांवरील प्रचंड खर्च, युथ बँकेतील ठेव, वासाचे दुधापासून उप पदार्थ निर्मितीतील अनियमतता, पशुखाद्य येणेबाकी, एनडीडीबी व्याज, आदींबाबत कोणताही खुलासा न करता राष्ट्रगिताचा गैरवापर करुन चेअरमन अथवा संचालक नसणा­या उद्योगपती माजी आमदार महाडीक यांनी सभा गुंडाळली. याचा सर्व दुध उत्पादकांचे वतीने जाहीर निषेध करत आहोत.

सर्वसाधारण सभेमध्ये भाषणाचा नवा पायंडा पाडत धर्माची भाषा बोलणा­या नेत्याने अहवाल न वाचताच केवळ एकाच मिनिटात सभा गुंडाळण्याचे अधर्मी कृत्य केले. त्याचा सर्व दुध उत्पादकांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.